संस्थेचे उद्देश :-

१. शैक्षणिक :-

लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे, सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था सुरु करणे उदा. बालवाडी ते सर्व शाखातील महाविद्यालये, कन्याशाळा, संगणक शास्त्र कार्यशाळा, आश्रमशाळा , सैनिकशाळा इ. त्याचप्रमाणे वसतिगृहे व सार्वजनिक वाचनालये , कोचिंग क्लासेस या सारखी शैक्षणिक मदत करणे, त्यांना शिष्यवृत्ती देणे, दत्तक पालक योजना चालू करणे, हुशार गुणवंत विद्यार्थांचा गौरव करणे इ. व्यवसाय अभ्यासक्रम , इंजिनीरिंग तसेच तंत्रनिकेतन कॉलेज , नर्सिंग कॉलेज , डी - फार्मसी , बी - फार्मसी, मेडिकल कॉलेज सुरु करणे.

२.  वैद्यकीय :-

संस्थेच्या कार्यक्षेत्रात सर्व प्रकारची आरोग्य शिबिरे आयोजित करून गरजूंना त्याचा लाभ मिळवून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्र पासून अद्यावत हॉस्पिटल उभारणे. रक्तदान शिबिरे आयोजीत करणे,रुग्णवाहिका सुरु करणे, देहदान नेत्रदान, कुटुंब नियोजन, एडस इ बाबत जनजागृती करणे.

३. उद्योग विषयक :-

तरुणांमध्ये उद्योजक प्रवृत्ती वाढावी यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण सुरु करणे, त्यासाठी तंत्रज्ञानाचे विविध अभ्यासक्रम व ट्रेनिंग सेंटर सुरु करणे, त्यांना स्वयं रोजगाराच्या निर्मितीसाठी आवश्यक ते सहकर्या करणे, लघुउद्योग व धंदा सुरु करणेसाठी मार्गदर्शन करणे. 

४. महिला विषयक :-

समाजातील महिलांना खर्या अर्थाने स्वावलंबी बनवणे, त्यांना विविध गृह उद्योग , कुतीरुद्योगाचे प्रशिक्षण देणे, अशिक्षित महिलांना साक्षर बनवणे, नोकर्या करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघरे , महिला वसतिगृहे सुरु करणे, महिलांसाठी मोफत कायदा सल्ला केंद्र चालविणे, महिलांचे बचत गट स्थापन करणे, त्यातून महिलांना भांडवल उपलब्ध करून देणे. महिलांचे विविध सांस्कृतिक व सामाजिक उत्सवांचे आयोजन करणे, त्यातून त्यांना समाजभिमुख बनविण्याचा प्रयत्न करणे, महिलांसाठी लघुउद्योग सुरु करणे, अनाथालय , वृधाश्राम सुरु करणे.

५. कृषी विषयक :-

ग्रामीण कार्याक्षेत्रातील गरीब व अल्प भूधाराकांसाठी अत्याधुनिक शेती तंत्राची माहिती उपलब्ध करून देणे. त्यासाठी शेती विषयक चर्चासत्रे , व्याख्याने, शैक्षणिक सहली आयोजीत करणे, शेतकऱ्यांचे शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे , ग्राम  विकासच्या सर्व योजना राबवणे, पाणलोट क्षेत्र विकास, पर्यावरण संतुलन , आदर्श ग्राम योजना इ कार्यक्रम राबविणे, शेतकर्यांना शेतीपूरक उद्योग धंद्याचे प्रशिक्षण देणे व मार्गादर्शन करणे. सामाजिक वनीकरणा संधर्भात कार्य करणे, गो पालन व गो रक्षण करणे. शेणखत व गोमुत्र गोळा करून शेतीसाठी पुरवठा करणे. गायी व म्हशेचे पालन व संवर्धन करणे . व शेती संलग्न इतर व्यवसाय करणेबाबत मार्गदर्शन करणे. गांडूळ खाताविषयी माहिती देणे व निर्मिती करून संस्थेचा खर्च भागवणे. पाणी अडवा - पाणी जिरवा कार्यक्रम राबविणे, पाझर तलाव कोल्हापूरी बंधारे,वृक्षारोपण , वृक्षदिंडी , कृषी विज्ञान केंद्र , सल्ला व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे.

६.   क्रीडा विषयक :-

संस्थेच्या माध्यमातून अत्याधुनिक व्यायामशाळा सुरु करणे, विविध क्रीडा स्पर्धा व शिबिरे आयोजित करणे , समाजातील प्रत्येक घटकाला शारीरिक तांदरुस्तीचे महत्व पटवून देणे, त्यांना व्यसना पासून अलिप्त राहण्याचा संदेश देणे, देशी - विदेशी खेळांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे, हस्यक्लब स्थापन करणे, प्राणायाम योगासने वर्ग आयोजित करणे व शारीरिक फिटनेस साठी सर्वाना प्रोत्स्ताहित करणे, मैदानी खेळ , सांघिक खेळ कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरु करणे. 

७ .  सामाजिक व विधायक :-

निरनिराळ्या राष्ट्रीय उत्सवांचे आयोजन करणे, समाजामध्ये सर्वधर्म समभाव , भाईचारा राष्ट्रप्रेम इ भावना जोपासण्यासाठी समाज प्रबोधन, समाजातील अनिष्ट प्रथा , अंधश्रद्धा , निरक्षरता, व्यसनधीनता , कुटुंब नियोगन , पर्यावरण , पाणी प्रश्न इ. ज्वलंत प्रश्नाबाबत जनजागरणाचे अभियान हाती घेणे , सार्वजनिक स्वछ्यता , सामाजिक वनीकरण या सारखे उपक्रम हाती घेणे, पूर भूकंप , वादळ इ अपग्रस्ताना मानवतेच्या भूमिकेतून सर्वातोपती सहाय करणे. समाजातील अनाथ, बेवारस मयताचे अंत्यसंस्कार मृताच्या धर्माप्रमाणे करणे, गरीब व अनाथ युवतींची लग्न सामुहिक पद्धतीने करणे, गोरगरिबांना अन्न , वस्त्र , निवारा या प्राथमिक गरजा मिळवून देणे.